पान:महाबळेश्वर.djvu/260

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २२५ )


इमारत करणे करितां झाडेंं तोडण्याची आवश्यकता पडल्यास त्याजबद्दल सुपरिटेंडेंट साहेबांची परवानगी घ्यावी लागते. कोळी व कुणबी नेहमी पाणी नजिक असेल तेथें झोंपडे बांधून राहतात.

 धावड व धनगर लोक येथील कायमचे रहिवासी झाले आहेत. धनगरलोक नेहमी गाई, ह्मशी बाळगून, दिवसभर त्यांस चरणाला नेऊन त्यांचे मागेंं फिरत असतात. त्यांना शेतवाडी क्वचित् असते. यांजवळ देशाप्रमाणे, मेंढया, बकरींं वगैरे नसतात धावड लोकांना दाढी असते, व त्यांचा पेहेराव मुसलमानी धरतीचा असतो. बाकीच्या सर्व जातींचा पोषाख पुष्कळ अंशी सारखाच असतो. कोळी लोकांचा धर्म हिंदु आहे. धनगर, कोळी व कुणबी यांची एक ग्रामदेवता व दुसरी पालण करणारी देवता असते, त्याप्रमाणे येथील ग्रामदेव अनेक असून जन्नी ह्मणून एक रक्षक देवता आहे. तिला काही सार्वजनिक संकटनिवारणार्थ देणे घेऊन जाण्याची येथेंं पूर्वापार चाल आहे, त्याप्रमाणे हल्लींं ब्राह्मण,