पान:महाबळेश्वर.djvu/261

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २२६ )

 वाणी उदमीसुद्धां वागू लागले आहेत. येथें वनदेवता, चेडे व भिंतर यांची आराधना करून आपल्या कार्याला त्यांची अनुकूलता संपादण्याची फार चाल आहे. या देवतांची पूजा वगैरे करणारे गुरव देवळांतच असतात. त्यांना देवापुढे येईल तें घेऊन राहण्यानें चांगलीच प्राप्ति होते. याशिवाय देवळांत आणखी दोन मनुष्येंं असतात त्यांस देवर्षी किंवा देवाचे भक्त म्हणतात. त्यांच्या भाकणीला देव भाक देतो अशी येथील मराठे, कोळी वगैरे लोकांची समजूत असल्यामुळे त्यांजकडून हे गांवढळ लोक कौल लावितात, आणि कौलांचा जबाब मागवितात. ह्यावर येथील बहुतेक लोकांची फार श्रद्धा असते. इकडील लोकांचा पिशाच्चयोनीवर फार भरंसा आहे. आणि त्या येानीपैकीं चेडे, पितर, मनुष्याचें बरें वाईट करणारी दैवतें आहेत असें मानून हे लोक त्यांस फार भजत असतात. यामुळे त्यांच्या भगत लोकांची चलती चांगली चालते. हे लोक आपल्यापैकीं ज्यानें कोणी आपलें नुकसान, घातपात, चोरी वगैरे करून उपद्रव दिला असेल त्या इसमाचें कांही अनिष्ट करण्या-