पान:महाबळेश्वर.djvu/259

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २२४ )

 वर व बंगल्यांवर कारोगेटेड पत्रे असून भिंती व लांकूड काम चांगलें मजबूत केलेलें असतें. प्रत्येक घराला किंवा बंगल्याला पुढें किंवा मागें जी खुली जागा असते, तिचे सभोंवार तांबड़े लहान मोठे माणसाच्या डोक्यासारखे गुंडगुळे दगड गोळा करून आणून गडगडा घातलेला असतो. अशी दुसरीकडे कोठेही पद्धत नसल्यामुळे परकीय मनुष्यास याची मौज वाटते. पेठेत प्रत्येक घरामध्यें सुमारें तीन फुटाचा बोळ टाकून घरें बांधलेलीं आहेत; व घरांपुढें रस्त्यानजिक दाट छायेचा एकेक वृक्ष राखिला आहे; त्या झाडापासून उपद्रव झाला तरी म्युनिसिपालिटीच्या हुकुमावांचून त्याला धक्का लावण्याची मनाई आहे.

 पेठेशिवाय आजुबाजूला झोंपडीवजा जंगलभर बंगले पसरलेले दिसतात. त्यांजबद्दलचे पद्धतशीर कांहीं नियम नसावे असें वाटतें. सर्व बंगल्यांना कपौंंड असून त्यांत सर्वत्र जंगली झाडांची छाया होऊन गेलेली असते. यामुळे बंगल्यांत बसलें ह्मणजे नेहमीं गार वारा येत असतो. बंगल्याच्या कंपौडांत नवीन