पान:महाबळेश्वर.djvu/26

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ६ )

 -या पथिकास वांईपाशीं कृष्णा उतरल्याबरोबर लागणारा आठ मैलाचा घांट चढल्यावांचून गत्यंतर नाही. यास पसरणीचा घाट म्हणतात.

 कोंकणपट्टीनें मुंबईकडून् मुंबईहून् कार्नाक बंदरांतून सकाळी साडेसहाच्या बोटीन निघून सायंकाळी साडेचार वाजतां बाणकोटास उतरावें; व पुढे लहान होडींत बसून सावित्रीच्या खाडीनें तीन तासांत दासगांवास यावें. बाणकोटाहून दासगांवास येतांना दैवयोगानें चांदणे पडलें असले तर वाटेनें सभोंवार दिसणा-या वनश्रींचें अनिवार कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाहीं. दासगाव बंदराजवळ धर्मशाळा व रहदारी बंगला आहे त्यांत रात्र गुदरावी किंवा आगबोटीनें नागोठण्यास उतरून तेथून दासगावास यावें. दासगांवाहून पहाटें उठून बैलगाडीनें निघून पोलादपुरास १६ मैलाचा पल्ला मारून जरा आराम घ्यावा. येथें बंगल्यांत व कोठेही उन्हाच्या रखरखीनें आलेला शीण परिहार करून संध्याकाळबरोबर आंबेनळी किंवा वाडा गांवचे घांटचढणीस लागावें. पोलादपुरापासून निघाल्यावर ५ मैलावर जुना किणेश्वर रस्ता लागतो. तो सोडून देऊन पुढें झुकावें. ह्मणजे डावीकडे पुनः एक रस्ता फुटतो, तिकडे