Jump to content

पान:महाबळेश्वर.djvu/27

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ७ )




वळून प्रतापगडाची शोभा पहात पहात वाडागांववर येऊन वाटल्यास तळ देऊन रहावें. इतके येण्यास पांच तास लागतील. वाडयापासून १० मैल फिटझर्ल्ड घाटाची लांबण संपल्यावर मुंबई पाइंटाजवळ लोक पोहोंचतात, व मग प्रवासाच्या दगदगींतून पार पडतात. इकडून येणा-या लोकांजवळ मुंबई सोडल्यापासून निदान २ | ३ दिवस पुरण्यासारखें फराळाचें सामान शिल्लक पाहिजे. ह्या रस्त्यानें येण्यांत येवढाच फायदा आहे कीं उत्तम त-हेचे देखावे दृष्टीस पडतात. ऐन उन्हाळ्यांत मात्र रस्त्यावर अगदीं धुराळा उधळून जातो. टांगा पाहिजे असल्यास मेल कंत्राटदाराला आगाऊ वर्दी दिली म्हणजे वदींप्रमाणें आगाऊ टांगा मिळतो.

 बेळगांव धारवाड कडील वाचकांस प्रवास करून जावली पेटयांतील मेढें खो-यानें केळघर नांवाचा घाट चढून या रम्य शैलावर येणें सोईचें वाटेल.

 साता-याहून मेढें १४ मैल आहे. येथें एक रहदारी बंगला असून सर्व सोयी आहेत. मेढयाहून निघून एकदम एकोणीस मैलांची मजल करून कित्येक लोक महाबळेश्वरी येतात. केळघर आणि मेढ्यास घोड्याचे दोन टप्पे ठेविले म्हणजे टांग्याने