पान:महाबळेश्वर.djvu/25

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ५ )




असल्यासारखी दिसते. पुढें वेण्या सरोवर व त्याचे कडेची दाट झाडी हीं पाहून गजेंद्रमोक्षाच्या वेळीं ज्या चंपा सरोवराच्या कांठीं जंगलांतून हत्ती येऊन तो चमत्कार घडला, तसाच या सरोवरांत अरण्य कुंजर येऊन होतो कों काय असें वाटतें.

पुण्यापासून (रेलवे मार्गानें) वाटार-६८/ मैल
वाटारपासून वांई .....................२०
वांईपासून पांचगणी·..................८
पांचगणीपासून महाबळेश्वर-.......१२
अशा त-हेचा या रस्त्यानें प्रवास होतो.
जुना पुणें रस्ता.
पुण्याहून शिरवळ ................३०/
शिरवळापासून सुरूळ ...........१६/
सुरूळपासून वांई ..................७

 बैलगाडीनें दोन दिवस व टांग्यांतून १० किंवा बारा तास , या दोन्हीं रस्त्यांनीं प्रवास करण्यास लागतात.

पुण्याहून गाडीरस्त्यानें जाणा-या लोकांनी एक तर कातरज व खंडाळा हें लहानसें दोन, घांट वलांडून सुरूळाहून वांई पहावी, हाही प्रवास वाईट नाहीं. पण कसेंही केलें तरी इकडून जाणा-