पान:महाबळेश्वर.djvu/258

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २२३ )

 दोन भेद आहेत. एक नियामक व दुसरा उत्पादक. पहिल्या वर्गात, राजे, मंत्री, शिपाई पोलिस वगैरे फक्त समाजयंत्राचे चालक किंवा व्यवस्थापक येतात. दुसरे वर्गात शेतकरी, कोष्टी, सुतार वगैरे सर्व प्रकारचे धंदेवाले येतात. येथील बाजारांत व आजुबाजूला सर्व दुसरे वर्गात येणारे लोकांची गदीं आहे. त्यांचा उद्योगही दीर्घ आहे. घाण्याचे दुकानांत वाण जिन्नस असून आणखी भुसारमालही मिळतो; गंधी असून तो पटवेकऱ्याचेंही काम करितो; असा यांना उत्पादक उद्योगाचा कंटाळा नसल्यामुळे जंगलांत बसले तरी सर्व, व्यापारी लोक कसे टुमटुमीत आहेत.

धावड कोळी वगैरेंच्या चालीरीती.

 येथें सर्व लोकांना मराठी भाषा समजतें. फक्त धावड व मुसलमान लोक खेरीज करून सर्वांची घरांतील बोलीही मराठीच आहे. धावड लोकांची भाषा मराठीच आहे, परंतु त्यांत हिंदुस्थानी शब्दांची बरीच भेसळ आहे. मुसलमान लोकांची मुसलमानी भाषा आहे. येथील सर्व लोकांच्या घरां-