पान:महाबळेश्वर.djvu/257

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २२२ )

 वरचा कलंक नाहींसा झाला आहे. मुक्रार जंगलाच्या हद्दीचें क्षेत्र ४,३३९ चौरस फूट ठरविलें आहे आणि त्यांत लोकांचे पूर्वीचे हक्कांत फेरफार केला नाहीं.

 मनुष्याच्या आहारवस्तु कष्टसाध्य आहेत, व त्यांची उपभोगेच्छा अमर्याद आहे, येवढ्या दोन गोष्टी स्पष्टपणें ध्यानांत घेतल्या ह्मणजे, त्यास इतर प्राण्यापेक्षां शेंकडोंपट अधिक उद्योग कां केला पाहिजे, हे सहज समजणार आहे. हें ज्यांस पक्केंं समजेल तो सहसा निरुद्योगी होणार नाहीं. याशिवाय निरुद्योगी लोकांस उद्योगी लोकांच्या वश होऊन किती त्रास सोसावा लागतो, हें ज्यांस कळले असेल तों तर स्वतः उद्योगी होईल इतकेच नाहीं तर इतरांसही उद्योग करण्यास प्रवृत्त करील. विशेष उद्योगी मनुष्याचें सान्निध्य नसल्यास सामान्य उद्योग करून आयुष्य घालविणें शक्य आहे. पण कोणत्याही कारणानें उद्योगी मनुष्याशीं गांठ पडल्यास, एक तर त्यांच्या प्रमाणें उद्योग करण्यास, किंवा त्यांच्या आधीन होऊन ते ठेवील त्या स्थितींत राहण्यास तयार झालें पाहिजे. उद्योगाचे