पान:महाबळेश्वर.djvu/256

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २२१ )

 करवंदे, मधाचीं पोळीं, नेचे, आर्चिड, शेवाळ वगैरे किरकोळ जिनसाही ते लोक आणून विकतात. ह्या जिनसा काढून आणण्यास जितके श्रम होतात व दिवस मोडतात त्या मानानें पाहिलें असतां घेणारांस जरी त्या जिनसास पुष्कळ पैसे दिलेसें वाटतें, तरी ते त्यांच्या मोडलेल्या दिवसाच्या मजूरीइतकेच पडतात. बांबूशिवाय बाकीचे जिन्नस फुकट आणतां येतात. आणि बांबूबद्दलसुद्धां ह्मणण्यासारखी फी द्यावी लागत नाहीं. एकंदरींत लागवडीची तूट जंगलांतील जिनसांनीं भरून काढावी लागत आहे.

 सन १८५३ सालच्या फेरफारामुळे त्यावेळच्या कृषीवलवृत्तीच्या वर्गास जें नष्टचर्य प्राप्त झालें होतें ते हें मालकमपेठ गांव अशा रेघारूपाला येईपर्यत पुरलेंं. अंगमेहनत करून पैसा मिळण्याचा क्रम १२ महिने चालत नसल्यामुळे शेतकीसारखे यांत सतत राबावें लागत नसे. असो. असा कामाठीपणाचा धंदा करणारे लोकांस त्यांचे जातभाई प्रथम हलके मानूं लागले व ते कमजातीचे लोक बनून गेले. पुढ़ें सर्वांनांच दिवस वाईट आल्यामुळे कालगतीनें त्यांच्या