पान:महाबळेश्वर.djvu/255

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २२० )

 लोकांनीं निर्वाह करण्याचें पूर्वींंप्रमाणें अवसान घातलें असतें, तर त्यांना नुसती जगण्याचीसुध्दांं पंचाईत पडली असती. आणखी या शेतकीची-शेतकीच्या उत्पन्नाची अगदीं अनास्था झाली आहे, त्यामुळे कृषीवलांतही कांहीं त्राण नाहींसा झाला आहे.

 तथापि वर सांगितल्याप्रमाणें मनुष्यांची वाढ कमी झाली नाहीं. शेतकीची अशी आबाळ झाल्यामुळे महाबळेश्वरच्या भोंवतालच्या खेडयांतील लोकांची स्थिति घांटावरील खेडगळ लोकांपेक्षां निकृष्ठतेस आली आहे, या कारणास्तव सडकेच्या कामावर किंवा मालकमपेठ येथें मोलमजूरी करून त्यास गुजारा करावा लागत आहे. मालकमपेठेस बाहेरून हवा खाण्यास पुष्कळ चैनी लोक येतात; त्यांच्याकडून यांना बरेंच काम मिळतें. तसेच जंगलांत होणाऱ्या फुकटच्या व उपयुक्त जिनसांचा बराच खप असल्यामुळे त्यांत तर यांस याहून जास्त फायदा होतो. गुरांस खाण्यास व घराचीं छपरें करण्यास गवताची पुष्कळ चणचण असल्यामुळे, तें आणून विकण्यांतही त्यांना किफायत होते. त्याचप्रमाणें सर्पण, काठया, फणस, आंबे,