पान:महाबळेश्वर.djvu/254

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २१९ )

 मनाई झाल्याबरोबर कमी झालीं त्यामुळे मांसाहारी जनावरांनाही नैसर्गिक प्राण्युत्पत्तीची वाण पडली. ह्या धनगरी जनावरांचीं अर्भकें केव्हां तरी मांसाहारींच्या भक्ष्यस्थानीं पडत, ती पडेनाशीं झाल्यामुळे त्यांनाही उतरती कळा लागली. याच पुरातन प्रचारांवरून धनगर लोकांत अशी चाल पडली आहे कीं, ज्या जवळ निदान दोनसुद्धां गुरें नाहींत त्यांचें लग्न होण्याची मुष्कील असते.

 नंतर त्यांनीं कृषीवलवृत्तीचा स्वकिार केला. ते कुणबी लोकांप्रमाणें पांच मैलांतील खोऱ्याच्या तळभागांत शेतकी करूं लागले. डोंगराळ प्रदेशांत सर्व जंगल राखून ठेविलें, या व्यवस्थेंत शेतकऱ्यांंचीच नुकसान झाली, आणि शेतकीला एकंदर जमिनींतून एक तृतीयांश जमीन मिळून तीही अगदीं संपुष्टांत आली. म्हणजे माणशी सरासरी अडीच एकर जमीन राहिली. पैकीं सातवा हिस्सा जमीन मात्र पाण्या खालचा ऊस, भात, खपली वगैरे पिके होण्यास लायख अशी राहिली. इतक्या जमिनीवरच्या शेतकीवरच जर बहुतेक