जेव्हां वाघ किंवा चित्ते यांचा वास येतो तेव्हां त्या आपल्या पालकाच्या सभोंंवार फेर धरून उभ्या राहतात आणि ज्या बाजूनें वास येत असेल त्या बाजूला शिंगेंं रोंंखून शत्रूचा चुराडा करण्याकरितां पवित्र्यांत उभ्या रहातात.
धावड किंवा लोखंडओतारी लोक हे मूळ कऱ्हाड गांवाकडून पाऊणशें वर्षांपूर्वी येथें आले. यांची जात मोठी कष्टाळू आहे. इतर जातींतील लोकांपेक्षां यांचीं गालाचीं हाडे उंच, डोळे बारीक, ओठ जाड व वर्ण काळा असतो. यांचा लोखंड काढण्याचा धंदा बुडाल्यामुळे जमिनी घेऊन शेतकी करण्याची यांना गोडी लागली आहे. परंतु मजूरीच्या दांडगट कामांत यांच्या बायकांचा किंवा पुरुषांचा कोणीही हात धरूं शकणार नाहीं. यांची वस्ती येथें फार आहे, तरी सर्व लोक मजूरीच्या धंद्यावर कमाई चांगली करून आनंदांत असतात.
मांस, दूध, आणि धान्य ही मनुष्याच्या उपजीविकेचीं मुख्य साधनें होत. यांपैकीं