Jump to content

पान:महाबळेश्वर.djvu/249

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २१४ )

 लोकांपेक्षा त्यांची सुरतही बरी दिसते. हे लोक सदांसर्वदां शेतांत खपत असतात. धनगर लोक पूर्वी फार भोळसर होते. त्यांचा त्यावेळीं दूध, व लोणी विकण्याचा धंदा होता. त्यांस वजन मापाची कांहींच माहिती नसे, त्यामुळे लोक त्यांस फार नाडीत असत. कोणी आपला पाय तागडींत ठेऊन माझा पाय दोन शेराचा आहे असें सांगून त्याच्या दडपण्यानें वाटेल तितका माल लाटित असत. कोणी तागडीला बोट लावून त्यानें पारडें दाबून धरून माझे बोट पावशेराचे आहे असें सांगून त्यांस अशा रीतीनें सपशेल फसवीत असत, असें सांगतात. परंतु अलीकडे ते फार हुषार झाले आहेत, तथापि त्यांचा स्वभाव तामसी नाहीं. हे लोक शरीरानें कृश असून कामाला कणखर नाहींत. हे लोक गुरें राखून आपल्या कुंटुंबाचें पोषण करितात. देशावरील धनगर लोकांप्रमाणे यांच्या जवळ बकरी किंवा मेंढरें नसतात. परंतु गुरें कांहीं तरी जवळ पाहिजेत, तीं नसल्यास त्यांचें लग्न व्हावयाचें नाहीं. या जातीची अशी समजूत आहे कीं ह्मशींना