पान:महाबळेश्वर.djvu/24

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ४ )




लहानशी टूमदार घरें व बाजार हीं वर उगवून आल्यासारखीं दिसतात. अशा दुतर्फा लागलेल्या जंगली पर्णकुटिकांच्या पलीकडे जाऊन पोहोंचेपर्यत एक मैलभर आपण उंच डोंगरावर आहों असें दिसत नाहीं. परंतु पुढे डावे हातास खोल दऱ्या व पलीकडे यवतेश्वर, सातारचा किल्ला वगैरे उंच स्थळे दृष्टीगोचर होतात.

 पांचगणीचे खालील खो-यांतून वाहणा-या प्रवाहाचे पाणी गहू व भाताच्या लहान लहान पट्टयांस पाट बांधून नेलेलें दृष्टीस पडतें. तसेंच भात व नाचणी पावसाळा अखेर कापून काढल्या नंतर त्यांत गहूं करितात, त्याचे शेतांत उभे राहिलेले सड येथे पिके असल्याची साक्ष देत असतात. ठिकठिकाणी चढ उतार लागून जात जात हा रस्ता महाबळेश्वर गिरिशिखरावर जाऊन पोहोचला आहे. या अंगास दाट उगवलेलीं काटेरीं झाडे व रानोमाळ पसरलेले कर्दळीसारखे आरारोटचे वर आलेले कांदे पाहून पावसानें आपली शिकस्त केली असावी असें वाटतें. वेण्या नदीचें खोरें पुढें लागतें त्याच्या बाजूची बागाईत कृत्रिम केली असतांही ती भोंवतालच्या खुरटया जंगलाप्रमाणेच स्वभावसिद्ध