अनुकूल गोष्टी मनांत न आणतां पोटाकरितां मनुष्य गेल्यावांचून राहत नाहीं. याच तत्वावर हल्ली येथें ब्राह्मण, गुजर, मारवाडी, मुसलमान वगरे जाती बरकतीचे धंदे करीत आहेत. सर्वांत खरे व्यापारी वाणी, गुजर आणि मारवाडी लोक आहेत; आणि त्यांचें साधारण वस्ती असेल तेथें दुकान नाहीं असें कालत्रयींसुद्धां होणार नाहीं. त्याप्रमाणें त्यांची या जंगली मुलखांतही बरींच दुकानें आहेत.
सर्वांत जास्त भरणा धावड जातीचा आहे. त्याचे खालोखाल कुळवाडी लोकांची वस्ती येथें व डोंगराखाली आहे. धनगर व कोळी लोकांची वस्ती ह्मणण्यासारखी येथें नाहीं, डोंगराखालीं आहे. ह्या चार जातींच्या चर्येत व बोलण्यांत पुष्कळ तफावत आहे. कोळीलोक सर्वांत हुशार आहेत. ते लोक बांधेसूद असून त्यांची छाती रुंद व शरीर गोलदार असतें. त्यांची ठेवण रांठ असून दिसण्यांत ते आडमुठे दिसतात. मध काढणे, शेतकी, मजूरी व पारध करणें हे त्यांचे नेहमीचे धंदे आहेत. कुळवाडी लोकही शरीरप्रकृतीनें सदृढ आहेत व कोळी