माणें पाण्यांतून सोडलेले हलके पदार्थ धबधब्याच्या माथ्यावर परत उडून येतात.
कित्येक विचित्र जिज्ञासूस या धबधब्याची शोभा तळाशीं कशी दिसत असेल हें जाणण्याची उत्कंठा असेल त्यांनीं ज्या ठिकाणीं धबधबा पडत असतो त्याचें समोर येऊन बसावें, या ठिकाणीं उभें राहून वर पाहणाऱ्याच्या अंगीं असामान्य धैर्य असेल तरच त्याचा निभाव लागतो. ज्यांचें धैर्य दगडासारखेंं असतें ते जिवावर उदार होऊन आपली उत्कट जिज्ञासा परिपूर्ण करण्यासाठीं आपले जीव आपल्या वाटाड्याच्या हवालीं करितात. हे वाटाडे येथील खेड्यांतील लोक असतात. यांना सहवासामुळे कसलीच भीति वाटत नाहीं. हे त्यास धबधब्याचे मागें घेऊन जातात. अशा ठिकाणीं उभे राहून पुढें पडणाऱ्या प्रचंड वारिप्रपाताकडे पहात, व रंध्रास भेदून जाणारा वारिनिर्घोष ऐकत, असतां मनाची जी स्थिति होत असेल तिची वाचकांनींच कल्पना करावी. अशा ठिकाणाहून जे सुरक्षितपणे परत येत असतील, त्यांस मृत्युमुखांतून बाहेर पड-