Jump to content

पान:महाबळेश्वर.djvu/244

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २०९ )

 केल्यावर पतिसमागमाच्या आनंदलहरी तिच्या हृदयांत येऊ लागून तिचें पाऊल वेगानें पुढें पडू लागतें, व प्रत्येक पावलास पुढें जाण्याची तिची उत्कंठा अधिकच तीव्र होते. अशा प्रेमलहरींनीं ती अगदीं बावरी होऊन जाऊन गर्जना करीत करीत ५०० फूट उंचीच्या कड्याखालीं उडी घेते तेव्हां तिला जे रागाचे कल्होळ येतात त्यामुळे दशदिशा भरून जाऊन आसमंतांतील इतर ध्वनि पंचत्वाप्रत पावल्यासारखे भासतात, आणि धबधब्याच्या आघातानें तळांत असह्य वारा उत्पन्न होतो. अशी बेफाम झाल्यामुळे सर्व उदकसंचय अत्यंत तप्त होऊन त्यास उसळ्या येत आहेत व त्यांतून स्फटिका सारख्या शुभ्र व हिऱ्यासारख्या तेजोमय, अंबुकणांच्या बाश्पांचे अनंत लोळ निघत आहेत कीं काय असा भास होतो ! यावेळीं हिच्या मैत्रिणी लांबलांब ठिकाणांहून येऊन हिला भेटत असतात. अशा झपाटयानें चाललेल्या स्त्रीस जर कोणी अडथळा केला तर तिचा क्षोभ होऊन ती ज्याप्रमाणे अडथळा करणाराला झिडकारून देतें त्याप्र-