पान:महाबळेश्वर.djvu/243

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २०८ )

 बाजूला वस्तीच्या मुळींच अभावामुळे वाऱ्यानें झाडांचीं पानें हालून जो आवाज होत असतो तो ऐकून अगदी पांचावर धारण बसून जाते आणि एखादें हिंसक जनावर आपली चाहूल झाल्यामुळे उठून खुजबुजलें असें वाटून अगदीं जिवांत जीव रहात नाहीं. याकरितां बरोबर मंडळीचा समुदाय असला ह्मणजे भीति न वाटतां चांगला दम येतो, याकरितां एकटया दुकट्याने येथें जाणें चांगलें नाहीं

वेण्णा धबधबा.

 मालकमपेठ गांवानजीक पाचगणी रस्त्याचे बाजूस एक मोठं सरोवर आहे त्याच्याकडे या धबधब्याचें जनकत्व आहे. पावसाळ्यांत अति पर्जन्यानें हें सरोवर जेव्हां उचंबळत आणि गुळण्या टाकीत असतें, तेव्हां वेण्णानदी या सरोवरांतून बाहेर पडल्याबरोबर मंदगति जात आहेसें पाहून मनांत असा तर्क येतों की माहेराहून सासरी जाणें हिला अगदीं नकोसें असल्यामुळे ही अशी रेंगाळत आहे की काय कोण जाणें ! पण तिचें तें रेंगाळणें फार वेळ टिकत नाहीं. मंद स्थितांत सुमारें ३ मैल प्रवास