पान:महाबळेश्वर.djvu/240

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २०५ )

या रस्त्याने रोज सकाळी हजारों लोक डोंकीवरून गवत वगैरे घेऊन मालकमपेठच्या बाजारांत विकण्यासाठी कोयना खोऱ्यांतील आठ दहा कोसाच्या प्रदेशावरून लगबगीने येतांना भेटतात. त्यांस तिकडील लोकस्थितीची व जंगलाची वरील माहिती विचारली असतां सहज मिळणारी आहे.

मालकम टेंंकडी.

 बाजारांतून पूर्वेकडे तोंड करून चाललेंं ह्मणजे समोर हिरवा कोट व पांढरी टोपी घालून प्रमुखपणाने उंच बसलेली जी वामनमूर्ति दिसते तिलाच हेंं नांव आहे. हिच्यावर जो बंगला दिसतो, तो कार व हार्डिंग साहेबांच्या मालकीचा होता. परंतु आतां तो बोमनजी दिनशा पेटिट यांनी खरेदी घेतला आहे. या बंगल्यावरून मालकमपेठ गांव व इतर टेंंकड्या पाहण्याची फार मजा वाटते. हा बंगला प्रथम या ठिकाणी जान मालकमसाहेबाने बांधून आपल्या लाडक्या मुलीचेंं चार्लट असें नांव या बंगल्याला ठेविल्यामुळेंं याला "मौंट चार्लट " असे ह्मणण्याचा पाठ होता. परंतु