पान:महाबळेश्वर.djvu/239

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २०४ )

 द्यांच्या कांठच्या प्रदेशाप्रमाणें उगीच सामान्य तऱ्हेचा नाहीं. ह्मणजे त्यांतील झाडी उंच आणि दाट वृक्षांची असल्यामुळे फारच भेसूर झाली आहे. कारण, मोठमोठाल्या तक्तपोशीच्या कडया, गवत व शेवाळ हीं कोयना कांठाला जितकीं विपुल सांपडतात तितकीं दुसऱ्या ठिकाणीं सांपडत नाहींत. तसेच रानटी श्वापदेंंही येथें फार आहेत. यामुळे हा कोयनाकांठ वरून पाहणारांस एकसारखा हिरवा पट्टा काढल्यासारखा दिसत असल्यामुळे फार छान दिसतो. हा कोयनाकांठच्या प्रदेशाचा देखावा महाबळेश्वरच्या आणखी कोणत्या तरी गाडी रस्त्यानें जाऊन गाडीतून हिंडण्याचे पूर्ण शोकी गृहस्थ पाहूंं म्हणतील, तर मात्र तो त्यांना कोठेंंच दुसरीकडे दिसणार नाहीँ. पुढील बाजूस सॅॅडलबॅगचा डोंगर फार स्पष्टपणें दिसत असतो. या लेडी नार्थकोट रस्त्यानें एक मैल गेल्यावर डाव्या हातच्या बाजूस ६ फूट रुंदीचा एक घोडेरस्ता दृष्टीस पडते. तो या रस्त्याच्या खर्चाच्या रकमेंतून शिनशिन घळी (Robber's cave) पर्यंत दुरुस्त करून घेतला आहे.