पान:महाबळेश्वर.djvu/241

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २०६ )

 १८५२ मध्यें बिशपसाहेबांस असें दिसून आलें कीं गांवचे लोक मालकमचे घर असें ह्मणतात. तेव्हां लागलींच त्यांनीं त्याप्रमाणें नांव दिलें, याचे पायथ्याशीं सार्वजनिक उपयोगाकरितां बिशपसाहेबांनीं एक तलाव बांधला आहे त्यास बिशपतलाव ह्मणतात. या टेंकडीवरून प्रतापगडच्या पश्चिमेकडील बराच प्रदेश दिसतो, ही सांगण्यासारखी विशेष गोष्ट आहे.

पाण्याचे धबधबे.

 येथें तीन धबधबे आहेत, त्यांला हिंवाळ्यांत पाणी बरेंच असल्यामुळे ते प्रेक्षणीय असतात.

चिनी धबधबा.

 सासून पाइंट व फॉकलंड पाइंट यांच्या दरम्यानचे सखल जागेंत जे ओढे आहेत त्यांना मालकमगांव रस्त्याच्या दक्षणेस चिनी लोकांच्या बागेजवळ धबधबा आहे ह्मणून यास चिनी धबधबा म्हणतात,

धोबी धबधबा (फॉल).

 हा धबधबा फार उंचावरून पडत नाहीं, यामुळे ह्या धबधब्याची मजा कमी वाटते असें नाहीं. हा फार