पान:महाबळेश्वर.djvu/23

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३ )



सुमारास वांई गांठली जाते. नंतर पुढें पसरणीचा घाट लागतो त्या घाटांतील निरनिराळ्या वळणांनीं वर चढून चाललो असतांना कृष्णा नदीचें खेोरें व महाबळेश्वरशैलाचे फुटलेले अफाट फरगडे यांची गर्दी उडालेली दिसते. एक दोन ठिकाणी समुद्रपृष्ठापासून (४६०५) फूट उंच असलेला तोरणा किल्लयाच्या व (३९९२)फूट उंच असलेल्या राजगड किल्ल्याच्या शिखरांचा भास होतो. आणि सर्वांत उंच असलेल्या अशा एका कडा तुटलेल्या पाईंंटावरून चोहीकडून जंंगलानें लपेटून गेलेलें महाबळेश्वरचें देऊळ व गांव हीं हळूच आपआपलीं डोकीं वर करताहेतशीं दिसतात. पुढें रस्ता वळल्याबरोबर तीं अदृश्य होऊन पुन्हां तोंडें दाखवीत नाहींत. आणि मग कृष्णेचीं वळणें व त्यांच्या भोवतालची कीरें झाडी यांची कंटाळवाणी लांबण लागते. कांहीं कांहीं ठिकाणीं टेंकडयांच्या घसरत्या बाजूवर धान्य पिकविण्यास जागा काढलेल्या दिसतात. बाकीचा डोंगर काळा खडकाळ दिसत असतो.

ही चढण पार पडल्यावर पांचगणीच्या लहान वसाहतीचा आनंददायक देखावा दृष्टीस पडतो. त्यांत उंच सुरूच्या व बांबूच्या झाडांच्या रांगांमधून