पान:महाबळेश्वर.djvu/238

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २०३ )


धुंडीत आहे असा दिसतो, त्या कड्याच्या ठिकाणाला खुद्द आपले हल्लींचे इलाखाधिपति नामदार नार्थकोट साहेब यांच नांव दिले आहे. याप्रमाणेंं अलीकडच्या मुंबईचे गव्हरनरांपैकीं यांचेच नांव कायतें जुन्या बड्या साहेब लोकांच्याप्रमाणेंं महाबळेश्वरी लोकांकडून अमर करण्यांत आलेंं आहे.

 या मार्गाने गाडी तर मुळीच जाऊ शकत नाहींं. कारण हा मार्ग जमीन खोदून काढून केला आहे, यामुळे फारच अरुंद झाला आहे. परंतु गाडींंतून जाणारे लोक या मार्गाने जरी पायींं किंवा घोडयावरून गेले, तरी त्यांस सूर्यकिरणापासून त्रास होण्याची बिलकूल भीति नाही, अशी गर्द झाडी या मार्गाच्या दोहों अंगांस राखून हा मार्ग काढला आहे. शिवाय या झाडीमुळेंं वाटेचे चढउतार पार टाकून गेल्यानेंं श्रम होऊन आंगाची जी तलखी होणार तिचेंंही काही अंशी निरसन होते. याप्रमाणेंं या वृक्षमंडपांतून (Glen) अगदी पाइंटावर आल्यानंतर पुढील खोऱ्यांत डोकावून पाहिले असतां कोयना कांठचा (Koyana valley ) लांबवरचा प्रदेश दृष्टीस पडतो. तो इतर न-