हे पान प्रमाणित केलेले आहे.
( 200 )
कडून संगमरवरी शिलालेख आलेला होता तोही आणखी येथें ठेविला आहे. परंतु येथील हवेनें हा दुसरा लेख १८४३ तच खराब होऊन लागेनासा झाला आहे. पहिला लेख तरी काळा झाल्यामुळे वाचण्याची पंचाईत पडतेच, तथापि दुसऱ्या इतकी याची दुर्दशा उडालेली नाहीं. यांतील गृहस्थ पिशाच होऊन लोकांना पीडा करूं लागल्यामुळे येथील लोक या थडग्यापुढें नारळ फोडतात, देणें देतात व कित्येक कौलही लावितात.
पहिला लेख पश्चिम बाजूस लाविला आहे त्यांतील मजकूर येणेंप्रमाणें:-
"लेफ्टेनेंट जनरल थामस सिडणे बेकवुइथ
K.C.B. मुंबईचे गव्हरनर आणि सेनापति
व राणीसरकारच्या तोफखान्यावरील कर्नल
यांचे स्मारक"
पुष्कळ दिवस अप्रतिम नोकरी बजावून शेवटींं तारीख १५ माहे जानेवारी १८३१ रोजी महाबळेश्वर पर्णकुटिकेंत यांस देवाज्ञा झाली. वय ६० वर्षे. "यांच्या दिलदार स्वभावाची व मनमिळाऊ