पान:महाबळेश्वर.djvu/234

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १९९ )



बेकवुइथसाहेवांचें थडगे.

येथील चर्चाचे मागील बाजूस चर्चाला लागूनच उच्च ठिकाणीं बेकवुइथसाहेबांचें फारच उंच थडगें बांधिलें आहे, तें इतकें की पांचगणीकड़न येथें येणारे लोकांना हें बऱ्याच अंतरावरून दिसत असतें. समुद्राच्या पृष्ठभागापेक्षां याची उंची ४५५८ फूट आहे.

यावर चढण्याची वाट हल्ली फार खराब झालेली आहे. थडग्यावर ३० फूट उंचीचा साधा चौकोनी मनोरा आहे. हें सर्व काम या साहेबांच्या मित्रमंडळीनी वर्गणी करून केले आहे. यास एकंदर ३००० रुपये खर्च आला आहे. बेकवुइथसाहेब १८३१ मध्ये या ठिकाणीं परलोकवासी झाले. त्या वेळी हे सर्व हिंदुस्थानच्या सैन्याचे सेनापति होते. हिंदुस्थानांत लढाया सुरू झाल्यापासून वाटर्लूूच्या लढाईपर्यंत नांवाजलेले लोकांच्या मंडळींत यांची गणना होत होती, आणि अद्यापिही होत आहे. येथें वरील स्नेही मंडळींनीं एक शिलालेख करून बसविला आहे. दुसरा त्यांच्या अनाथपत्नी-