पान:महाबळेश्वर.djvu/233

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १९८ )

 स्थांस फार चीड आहे. अशा रीतीनें जपून मोठया कडयाचे मस्तकावर जाऊन बसलें ह्मणजे देशाकडील बाजू लांबपर्यंत दृष्टीस पडते. परंतु इकड़े देखावे वगैरे कांहीं मिळावयाचे नाहींत. तथापि खालील कृष्णानदीच्या प्रवाहाचीं वेडवांकडीं वळणें व लहान लहान पिकाचीं असंख्य भातखाचरें यांची मात्र फार शोभा दिसते. कमलगड, पांडवगड व मांढरदेव हे डोंगर फार भव्य दिसतात. तायघाट मध्यंतरीं आड असल्यामुळे वांई मात्र येथून दिसत नाहीं. डोंगर अगदीं जवळ दिसलेमुळे पावसाच्या पाण्यानें खणून खणून पडलेल्या त्यांवरील पनाळी फार भयंकर दिसतात. रबरी धावेच्या गाडया इकडे येण्यासारखा अलीकडे रस्ता केला आहे. पुणें रस्त्यानें वेण्णा तलावाच्या पुढें सुमारें दीड मैल गेलें ह्मणजे या पाइंंटाचा रस्ता फुटतो. ही फुटवाट जुन्या मालकमपेठचे रस्त्यांत मोडत होती, तेव्हां हिला फेरीसाहेबाचा रस्ता असें ह्मणत असत. ही अगदीं पाउलवाट असून दह्याट गांवांकडून आली आहे.