Jump to content

पान:महाबळेश्वर.djvu/232

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १९७ )



केटसपाइंट

 याला येथील गांवचे लोक नाकेखिड असें म्हणतात. हा येथून जुने पांचगणी रस्त्यावर फक्त चार मैल आहे. येथें पाहण्यासारखा एक विलक्षण मोठा खडक आहे. याची दर्शनी बाजू कृष्णानदीचे खोऱ्याकडे खांबाप्रमाणें उभी आहे व मागील बाजू दादर केल्याप्रमाणें आहे, तीवरून चढून जातात. जवळच सुमारें १०० फूट उंचीचा खडपा आहे. तो जणुं या मोठ्या खडकाचें पिल्लूूंच बाहेर पडलेलें आहे कीं काय असा दिसतो. ह्या खडप्यापासून सहा फुटावर याचा जनक खडक उभा आहे. या दोघांची ताटातूट झाली होती परंतु आतां त्यांच्याच जातभाईंनीं मध्यें पडून दोघांचा संबंध जोडला आहे. हे मध्यस्थ गृहस्थ फार कृश व किरकोळ घराण्यांतील असल्यामुळे थोरांप्रमाणें याजवर एकदम पुष्कळांची धाड घालण्याची गोष्ट तर एकीकडेच राहिली परंतु जो कोणी एखादा त्यास भेटण्याची इच्छा करील त्याला नम्रतेने खालीं मान घालूनच गेलें पाहिजे. तो जर इकडे तिकडे पाहील तर त्याची या मध्य-