हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १९२ )
अर्धा मैल आहे. ह्या दोन्ही ठिकाणचे देखावे सारखेच दिसतात, मुंबई पाइंटापेक्षां या दोन ठिकाणांपासून सॅॅडलबॅॅगटेकडी समग्र दिसते. परंतु मुंबई पाइंट आड आल्यामुळे सूर्यास्ताच्या समयींचा चमत्कार तेवढा यांवरून दिसत नाहीं. फाकलंड पाईंंटावर गाडया क्षणभर उभ्या करण्यास जागेची वाण नाहीं. येथून वाबिंगटन पाइंटाचे कडे अगदीं साफ दिसतात. या दोन पाइंटाच्या आसपास डोंगरांची रांग नसल्यामुळे हे जमीनींतून उगवल्यासारखे दिसतात. या दोन पाइंटावर चौफेर दाट झाडी आहे. आक्टोबर महिन्यांत इकडील रस्त्यावरून शेवाळाची मजा दिसते.
फाकलंड पाईटच्या जवळच्या वनांतील रस्ता.
या झाडींत तयार केलेल्या जागीं स्वच्छ उजेड वगैरे आला ह्मणजे मोठी मासलेवाईक शोभा दिसते. वनभोजनाकरितां येण्यालायक ही जागा आहे. येथें साहेब लोकांचा गोल्फचा खेळ चालतो. त्या खेळाला जशी पाहिजे तशी येथें झाडी आहे. वेस्टवुड व फर्न बंगल्यानजीक महाड रस्याला जे