पान:महाबळेश्वर.djvu/228

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १९३ )

 अनेक रस्त फुटले आहेत, त्यांतील डावे हातचा रस्ता थेट फाकलंड पाईंंटावर जातो. तसाच डावीकडे टायगरपाथ टाकून उजवीकडे नीट डोंगराच्या कडेनें जाण्यास एक लहान घोडे रस्ता आहे. तो जेथपर्यंत जाऊन पोहोंचला आहे त्या ठिकाणाला एको पाईंंट अशी संज्ञा आहे. त्या रस्त्यानें खालील खोऱ्याची वनशोभा चांगली दिसते. म्हणून पायीं फिरण्यास जाणारांस हा चांगला मार्ग आहे.

सासून पाईंंट.

बाजाराकडून बाबिंगटन पाईंंटला जाण्याचा रस्ता आहे, त्या रस्त्यानें निम्यावर गेलें म्हणजे हा पाईंंट येतो. याचे समोर लांबीचे अंतरावर फाकलंड पाइंट दिसतो. याचे पुढील सखल प्रदेशांत वुडलॉंन बंगल्याजवळ टायगरपाथला एक रस्ता मिळालेला दिसतो.या रस्त्याचे उजवे बाजूस चिनी लोकांच्या बागा असून डावे बाजूस धबधबे आहेत, ते फारच मजेदार दिसतात. या रस्त्याने हवा खाण्याकरितां पायीं व घोडयावरून पुष्कळ लोक जात येत असतात.

क्यानॉट शिखर

 यांचे मूळ नांव "तंदूळनदी " असें आहे. याची