पान:महाबळेश्वर.djvu/226

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १९१ )

 गेलें म्हणजे त्या गिरिवीराची शोकावस्था दृष्टीस पडू लागते. जणूं काय हा मागील गत गोष्टी मनांत येऊन ज्या पुण्यश्लोक, ईश्वरपरायण आणि गोब्राह्मण प्रतिपालकाच्या निवासानें श्रीजगदंबेचे पाय आपल्या मस्तकीं लागून राजगुरू व साधुश्रेष्ट रामदासस्वामी यांच्या आगमनाचा लाभ होत होतां, तो छत्रपति, तो राजश्रेष्ठ, तो स्वदेशाभिमानी, तो आर्यधर्मप्रतिपालक, तो गुणग्राही, उदार, पुण्यश्लोक शिवराजा आतां आपणास नाहीं, त्याअर्थी आपलें जिणें व्यर्थ आहे अशा विचारानें पोटांत भडभडून आल्यामुळेच दुःखांत निमग्न झालेला असतो आणि दिनमणीचा प्रकाशपडेपर्यंत मेघपटलरूप वस्त्रानें आपलें तोंड झाकून घेतों असें दिसतें. सारांश, प्रतापगड पाहून विचारवंताच्या मनांत हे सर्व तरंग उठणें साहजिकच आहे.

कारनाक व फॉक््लंड पाईंंट.

कारनाक व फॉक््लंड हीं दोन गव्हरनरांचीं नांवें या दोन पाईंंटांस दिलीं आहेत. - मुंबई पाईंंटपासून कारनाक पाईंंट पाव मैल आहे; व फॉकलंड पाईंंट