पान:महाबळेश्वर.djvu/222

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १८७ )


विकार असा जो प्रभु त्याचा महिमा अपार व लीला अगाध आहे. आपण क्षुद्र व अकिंचन आहोंं. आपलेंं काय ! पण महान् महान् राजे व योद्धे ज्यांनींं शेकडोंं वर्षेंं राज्य करून दिगंतरी कीर्ति पसरविली त्यांचीही दुर्दशा आपल्याप्रमाणेंंच आहे!

 या गोष्टीचेंं प्रत्यंतर या ठिकाणी तत्काल दिसून येते. तेंं असेंं कींं, कमळगड, प्रतापगड, व पुरंदर हे तीन किल्ले येथून दिसत असतात. मुसलमानांचे राज्य असतां या प्रांतींं विजापुरकराचेंं ठाणेंं कमळगडावर असे. पुढेंं मराठ्यांनींं यवनांचा पराभव करून प्रतापगडी आपलेंं ठाणे केलेंं. नंतर पेशव्यांनी राज्यश्री भोगिली, परंतु ते यवन, मराठे व पेशवे आज कोठेंं गेले त्यांचा पत्ता नाही! त्यांनींं या ठिकाणी राजविलास भोगले, शूर कृत्येंं केलींं, आणि यावच्चंद्रदिवाकर आपली सत्ता चालावी म्हणून मजबूत व दुर्गम किल्ले बांधिले. पण हल्लींं ते किल्ले धूळीस मिळत चालले आहेत! हल्लींं सर्व राजसत्ता प्रस्तुतच्या राज्यकर्त्यांस प्राप्त होऊन त्यांनींंही या शैलशिखरावर मालकमपेठ हेंं विलासाचे स्थान का-