पान:महाबळेश्वर.djvu/223

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १८८ )

 यम केलें आहे, तेवढें मात्र शोभायमान दिसतें. बाकीच्यांचा लय झाला. तस्मात् हे ईश्वरा ! आह्मीं मर्त्य, अकिंचन, अनभिज्ञ मानव आहेत. आमचें तुझ्या अमानुष शक्तीपुढे सामर्थ्यं किती ? तुझा परम मित्र व भक्त जो अर्जुन त्यानें सुद्धां विश्वरूप पाहिल्यानंतर तुझा स्तव केला आहे. तेव्हां आम्ही या आर्थरसीटवरून ज्या जड वस्तु पाहून कुंठित होऊन गेलों आहों, त्या निर्माण करणाऱ्या जगच्चालका, तुझी मात्रा व शक्ति अगाध आहे त्यांची आह्मी पामर कल्पनाही करू शकत नाहीं. याकरितां आमच्या कोते विचारानें झालेल्या प्रमादांची क्षमा कर.

---------------
मुंबईपाईंट.

 मुंबइला जळमार्गानेंं जाण्याच्या जुन्या रस्त्यावर हा पाईंंट असल्यामुळे याला मुंबईपाईंट असें नांव पडलें आहे. मालकमपेठेपासून दोन मैलांवर रडतोंडीच्या घांटाच्या ऐन माथ्यावर हा पाईंंट आहे. या रडतोंडीच्या घाटाला हल्ली फिट्झर्ल्ड घांट असें ह्मणतात. येथील सर्व पाइंटांत ह्या पाईंंटाला येणारे लोक फार अस-