Jump to content

पान:महाबळेश्वर.djvu/221

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १८६ )

 प्रमाणें दिसतात. पर्वतावरील ब्रह्मारण्यांत तपोवनामधील वृक्षसंमर्द, पुरातन तपश्चर्येचीं स्थानें, दऱ्या, व गुहा, इत्यादि यांचा एकत्र समुच्चय एकसमयावच्छेदेकरून दृष्टिगोचर झाला म्हणजे जो लोकोत्तर निरतिशय, व अमानुष चमत्कार दृष्टीस पडतो आणि जी सृष्टीची नैसर्गेिक स्थिति साक्षात् नेत्रांसमोर येते, त्याकडे लक्ष दिलें ह्मणजे पाहणारांच्या अंतःकरणाची वृत्ति काय होते हें त्यांसच विचारलें पाहिजे. कितीही मोठा पाषाणहृदयी नास्तिक असला तथापि या ठिकाणींं आणून त्यास उभे केलें तर निमिषमात्राचा अवकाश न लागतां त्याच्या सर्व पाखंडमताचा भंग होऊन तो ईश्वरपरायण होईल यांत किंचिंतंही संदेह नाहीं. आपल्या सारख्याचा तर ऊर दडपून गेल्याप्रमाणे होतो, आणि गर्व असल्यास सर्व हरण होऊन वृति अगदीं लीन व नम्र होते. जिकडे पहावें तिकडे ईश्वर दिसू लागतों. व अंतर्यामीची गडबड होऊन विचारास अवसर सांपडला ह्मणजे वाटतें की जगदीश, जगन्नियंता, जगत्प्रतिपालक, सर्वज्ञ, सर्वसाक्षी, सर्वशक्ति, अनादि, अनंत, निराकार, नि-