Jump to content

पान:महाबळेश्वर.djvu/218

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १८३ )

   ही वर सांगितलेली शिडी उतरून गेलें ह्मणजे उजवे हातास फार घोर अरण्य दिसतें. हें जोरखोऱ्याचे हद्दीत आहे. यांस माणिकचैोक असें ह्मणतात. हा चौक पूर्वी जावलीचा राजा चंद्रराव मोरे यानें बांधून तयार केलेला होता. तो पुढें शिवाजीमहाराजांच्या हातीं आला तेव्हां ह्या जंगलांत गुप्त फौज व शिबंदी ठेवण्यास त्यांनीं ही जागा केली होती. आतां या वाटेनें या जंगलामुळे दिवसाही एकटें दुकटें येतांना मुठींत जीव धरून यावें लागतें. या जंगलांत हाताच्या वेंगेंत न मावणारे अशा मोठमोठया वृक्षांची झाडी इतकी दाट आहे कीं त्यातून लंबायमान सूर्यकिरणांचा ऐन दोनप्रहरीसुद्धां प्रवेश होऊं शकत नाहीं. येथील खळ्या खणणारे पावसास या जंगलांत जमिनीवर थाराही मिळत नाहीं. वाघ, चित्ते, गवे वगैरे क्रूर हिंसक पशू यांतील गारव्याचे ठिकाणीं खुशाल भ्रमण करीत असतात. अशा शांत, निर्जन, आणि हिंसक श्वापदांनीं गजबजलेल्या अरण्याचे जवळूनसुद्धां जाणाऱ्या एकट्या दुकट्या मनुष्यास जनावरें येऊन आलिंगन