देण्यास निःशंक बाहेर आलेलीं कधी कधी दृष्टी पडतात, तेव्हां अगदी पांचावर धारण बसून जाते कारण अशा भयंकर चिंचोळ्या वाटेने जाणाऱ्यास जीव घेऊन पोबारा करीन असे वाटल्यास तेंंही अशक्य ! कारण, दोहीकडे अस्मान कडे ! वाघोबाचीही स्वारी भक्ष्य मिळविण्याकरितां रानांतून हवी तिकडे भटकत असल्यामुळे त्याचीही केव्हां केव्हां मुलाखत होते. परंतु या रानचे सराईत कोंकणेलोक वाघास वाघरूं ह्मणून तेव्हांच धुडकाऊन देतात.
या गृहस्थास दिवसास रानांतील प्राण्याचे खाद्य सांपडले नाही ह्मणजे रात्रीस महाबळेश्वर गांवांत शिरून तो बाहेर उघड्यावर बांधिलेल्या गुरांचा फन्ना उडवितो. चोहोकडे अशा निर्जन वनांत अगदी निःसीम शांतता असतांही खालील नदी काठच्या मेंढरांच्या कळपांचे बेंंबेंं ओरडणेंं, व गुरांच्या कळपांचे हंबरणेंं वर असलेल्या इसमास ऐकूसुद्धां येत नाही. अशा खोल दरीत डोकावून पाहिलेंं तर भोंड येईल असे वाटतेंं.