पान:महाबळेश्वर.djvu/217

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १८२ )

   या खडप्यावर येण्यास दुसरी एक लांबणीची परंतु सुलभ अशी पाऊलवाट आहे. ही वाट तशीच नीट कोंकणांतही गेली आहे. तिला ढवळाघांट असें ह्मणतात. या कठडेवजा खडप्याजवळ या वाटेला खडकांत एक सुमारें २० फूट खोलीचा खडुा आहे. त्याचे पलीकडे जाण्यांस जंगली दाणगट सोट उभे व आडवे बांधून शिडीसारखी सोय केली आहे. त्या वाटेनें कोंकणेलोक सडे व ओझी घेऊन जातां येतां पुष्कळ दृष्टीस पडतात. जोरखो-याच्या बाजूस असलेल्या खेड्यापाड्यांतील लोकांना प्रसंगोपात्् महाबळेश्वरीं पावसाळ्यांत येण्याचें प्रयोजन पडल्यास ते वेदगंगेच्या उगमाचे वरील बाजूनें एका खिडीतून येऊन त्या पाऊलवाटेला लागतात, आणि पुढे आर्थरसीटवर रस्त्याला मिळतात. या खिडीचे नांव बहिरवदरी असें आहे. या बहिरवदरीजवळ वेदगंगेला एक ओढा मिळतेी त्याचें नांव यतिरा असें आहे. यास उन्हाळयांंत सात वेळांं जास्त पाणी येतेंं असेंं येथील लोक सांगतात.