पान:महाबळेश्वर.djvu/211

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १७६ )

 ळ्यांत पडल्यासारखे होणार नाही. ही जागा औरस चौरस सुमारें २० फूट असून एक पुरुषापेक्षां जास्त खोल आहे. याचा असा चमत्कार आहे कीं यांतील माती ( भस्म) पांढरी असून लोण्यासारखी नरम आहे. यावर गवतसुद्धा उगवत नाहीं. यावरून ब्रह्मारण्याचे वर्णनांत सांगितल्याप्रमाणें ही यज्ञाचे स्थंडिला (altar) ची जागा असावी असें वाटतें. कारण, नुसत्या राखेंंत ( ashes) झाड किंवा गवत कधीही यावयाचें नाही असा नियम आहे. त्यास अनुसरूनच येथील वस्तु स्थितेि आहे. भस्माचे जागेला लागून सावित्रीच्या उगमाचा प्रवाह अस्मान कड्यावरून खाली पडून दरींतून चालला आहे तेही पाहण्याची मोठी मौज आहे. एल्फिन्स्टन पाईंटापासून आर्थर सीटपर्यंतचा गाडी रस्ता कडयाच्या किनाऱ्याने असल्यामुळे कड्याच्या बाजूला पारापेट (कठडेवजा ) भिंत घातलेली आहे.. तथापैि येथें गाडी बेतानेंच हांकावी.