पान:महाबळेश्वर.djvu/212

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १७७ )



आर्थरसीट.

 हा पाइंट मालकमपेठेपासून आठ मैल व महाबळेश्वरक्षेत्रापासून पांच मैल आहे. हा पाइंट ब्रम्हारण्याकडे आहे. या पाइंटला जाण्यास महाबळेश्वरक्षेत्राला जाऊन, तेथून पुढें बोर्ड लाविला आहे तिकडील रस्त्याला वळून, ब्रम्हारण्यांतून जावें लागतें. समुद्राचे पृष्ठभागापासून याची उंची ४४२१ फूट आहे. यावरून इकडील बाजूच्या शैलशिखरांचा हाच मेरुमणी आहे असें ह्मणण्यास हरकत नाहीं. या पाईंंटानजीकच्या खुल्या जागेंत आर्थर मॅलेट साहेब झोंपडी बांधून राहिले होते. म्हणून यास आर्थरसीट असें नांव पडलें आहे.

या झोंपडीच्या खुल्या जागेपलीकडील उतरणीच्या घट्ट जमिनीवर मातींत खोंदून केलेल्या पाय-यांवरून उतरून जातांना अंग तोलून धरून नेटाने पावलें टाकीत टाकीत गेलें ह्मणजे, मनुष्य या पाईंंटाचे प्रचंड कडयाच्या अगदीं काठांवर येऊन पोहोंचतें. येथें आल्यावरही या तरवारीच्या धारेसारख्या उभ्या काळ्या ठिक्कर पाषाणाच्या