पान:महाबळेश्वर.djvu/210

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १७५ )


करूं नये म्हणून बंदोबस्ताकरितां आदले दिवशी किंवा आपण तेथे जाऊन पोचण्याचे पूर्वी काहींं वेळ एखादा माणूस पाठवावा लागतो. त्याचप्रमाणे थंडीचे दिवसांत तेथेंं कोणी जाईल तर त्यानेंं आपल्या स्वयंपाक्याला बंगल्यांत कोठेंं मधाची पोळी लागली आहे की काय ह्मणून पाहण्यास ताकीद द्यावी; नाही तर यांनींं स्वयंपाकाच्या चुलीचा धूर केल्याबरोबर जर बंगल्यांत एखादें मधाचेंं पोळेंं लागलेंं असलेंं तर त्या पोळीतल्या माशा एकदम येऊन सर्वांवर धाड घालतील, आणि सर्वांना " ऊठ की पळ " करून सोडतील. असा दोनदां अनुभव आल्यामुळे ही सूचना दिली आहे.

 एलफिन्स्टन पाइंटवरून आर्थर सीटला जाण्याची जी गाडीवाट आहे तिचे पहिले मैलांत बह्मारण्यांतील भस्माचे जागी जाण्यास डावे हातास एक पाऊलवाट आहे. तिला रहदारी नसल्यामुळेंं ती चांगली मळलेली दिसत नाही. यामुळेंं ती नवीन गैर माहीत लोकांना एकदम लक्षात येत नाहींं. या फूटवाटेला एक बोर्ड लाविला ह्मणजे जिज्ञासु लोकांना तेथे गेल्यावर बुचक-