पान:महाबळेश्वर.djvu/209

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १७४ )

 कांहीं ठिकाणीं ठेविलें आहे. यांत जेवणाच्या टेबलावरील सामान नसून जेवण करण्यास आचारीही नाही, यांचा उपभोग घेणारांस रोजची फी ३ रूपये द्यावी लागते. या बंगल्याला नेहमीं कुलूप असून त्याची किल्ली सुपरिंटेंडंटसाहेबांच्या आफिसांतील ओव्हरसीयरजवळ असते. ती सुपरिंटेंडंट साहेबांकडे मिळण्याबद्दल अर्ज केला ह्मणजे कोणासही मिळते. तेथील सुखोपभोग घेण्याचें मनांत आल्यास प्रथम तेथें शिधासामुग्री पाठवावी आणि नंतर सकाळीं निघून तेथें जावें, हा उत्तम पक्ष होय, त्या बंगल्याला जाण्याचा रस्ता केवळ उन्हाळ्यांत माणसें जाण्यासारखा आहे. महाबळेश्वर गांव किंवा देवळापावेतों मालकमपेठेहून चौचाकी गाडी नेण्यात कांही हरकत नाहीँ. परतु तेथून पूढे मात्र टांगे किंवा घोडीं जाण्यासारखाच रस्ता आहे. त्या बंगल्यांत वनभोजनास जाण्यासंबंधी दुसरी एक अवश्य तजवीज करावी लागते ती ही कीं त्या बंगल्याच्या मागील बाजूस बंगल्याला लागुनच असलेल्या खडकांतून जो एक वाहता झरा आहेंं त्याचें पाणी या गांवच्या गुरामाणसांनी खराब