पान:महाबळेश्वर.djvu/206

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १७१ )

 करून मुंबईइलाख्याचे डोक्यावर यानें परोपकाराचा मोठा बोजा करून ठेविला आहे.”

 उत्तरेच्या बाजूचा लेखः--

 " लाडवुइकसाहेबाचे अशा दीर्घश्रमाबद्दल सरकारच्याच हुकुमानें या टोंकाला लाडवुइकपाइंट असें नांव देिलें आहे. सन १८२७ सालीं निबिड अरण्यांतून हळू हळू आणि अविश्रांत श्रम घेऊन यानें या स्थळीं येण्याचें धाडस केलें होतें; ह्मणून त्याचे स्मारकास हेंच योग्य स्थळ आहे असें समजून त्याच्या एकुलत्या एक मुलानें ही कबर येथें बांधिली आहे; हा मुलगा पहिल्यानें मुलकी खात्यांत शिरून पुढे १८७४ मध्यें मद्रास इलाख्याच्या अकौन्टंट जनरलच्या हुद्यावर गेला होता."

एलफिन्स्टन पाईट.

हें टोक मालकमपेठेपामून सहा मैल व क्षेत्र महाबळेश्वरापासून एक दीड मैल आहे. या टोंंकाचेंं नाव नामदार माउंट स्टुअर्ट एलफिनस्टनसाहेब यांच्यावरून पडलें आहे. सॅनिटेरियमकरितां जागा प्रथमत: या ठिकाणीं कायम करण्याचा बेत होता. परंतु