येथें पाण्याची कमताई असल्याकारणानें पुढें मालकमपेठची जागा ठरली गेली, तेव्हां या ठिकाणींं त्यांनीं एक आपला बंगला बांधला.
हा पाईट एका अजस्त्र कडयाचे टोंकावर असून, खालीं कोयनेच्या खोऱ्याची तीन हजार फूट खोल अशी एक भयंकर घळ आहे. या टोकावरून डोकावणे फार धैर्याचें काम आहे. कारण, खालीं जो भव्य भयानक प्रकार दिसतो, ते पाहिल्यावर डोळे फिरून जाऊन अगदींं अंधारी येते; व पाइंटाचा खडक अगदींं घसरतां असल्यामुळे उभ्यानें पाहण्याची तर सोयच नाही. या घळीचे समोर प्रतापगडचा किल्ला उभा आहे. तसेंच सावित्रीनें महाबळेश्वराच्या मस्तकांतून निघून ज्या चिंचोळ्या खोऱ्यामध्यें चार हजार फुटीचे उंचीवरून धाडकन् उडी टाकिली आहे त्या खोऱ्याचा प्राग्् भाग एलफिनस्टन पाईंंटाच्या उत्तरेस आला आहे; व पश्चिमेस समुद्रसुशोभित कोंकणपट्टी सरधोपट पसरली असून त्यावरील लहान लहान डोंगर व टेंकडया कित्येक काळ्या, बहुतेक भुऱ्या व मधून मधून हिरव्या दिसतात. हा किंचित् उंच सखल