Jump to content

पान:महाबळेश्वर.djvu/205

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १७० )


सैन्यावरील नोकरींत यानेंं बहुतेक आयुष्य खर्च केलेंं होतेंं

 पूर्वेच्या बाजूस लेख आहे तोः--

 " सन १८०३।४ साली सैन्यामध्ये जे फेरफार करण्यांत आले त्या वेळी याने आर्थर वेलस्लीसाहेबाच्या हाताखालींं सबालटर्नचे हुद्द्याची कामगिरी बजाविली होती. खडकीच्या लढाईत ता० २५ नोवेंबर सन १८१७ मध्ये हा कपतान फोर्डच्या सैन्यांत ब्रिगेड मेजर होता. या वेळी २८०० गोरे पायदळाच्या लोकांनींं पेशव्यांचा पराजय करून पुरंधर व दुसरे डोंगरी किल्ले घेतले, तेव्हां हा त्यांत होता. सन १८२४ मध्ये कितूर येथील पलटणीचाही हा नायक होता. पुढे हा मुंबईचा टाऊन मेजर झाला आणि शेंंवटी साताऱ्यास रेसिडेंटच्या जागी आल्यावर हिंदुस्थानांत येणाऱ्या गोरे अम्मलदारामध्येंं नोकरीत यानेंंच पहिला नंबर मारला होता. या हवेपासूनचे फायदे यानेंंच प्रथम लोकांच्या मनांत आणून दिले, आणि महाबळेश्वर हेंं हवा खाण्याचे ठिकाण करण्याचा योग आणिला. याप्रमाणे हेंं हवाशीर स्थान शोधण्याचे दीर्घ परिश्रम