Jump to content

पान:महाबळेश्वर.djvu/204

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १६९ )



लाडवुईकचें स्मारक.

 सरकारचे हुकुमानें जनरल लाडवुईक साहेबांच्या मुलानें या ठिकाणी हा स्मारकाचा एक स्तंभ बांधून ठेविला आहे. हा त्यावरील घुमटासुद्धां जमिनीपासून सुमारें २५ फूट उंच आहे. या स्तंभाचे पश्चिमांगास संगमरवरी दगडाचा साहेबबहादुरांचा मुखवटा (bust) एका लोखंडी चौकटींत घालून गाडलेला आहे व चौकटीचे बाहेरून जस्ती तारेचीं वेष्टनें दिलीं आहेत. परंतु चौकटीलाच ताम्रा लागल्यामुळे तोंडावर डाग पडले होते, ते खरवडून काढलेले आहेत तरी यामुळे हा मुखवटा कुरूप झालेला दिसत नाहीं. या स्तंभाच्या दक्षिणेच्या बाजूस लेख लिहिला आहे तो:-

   "इसेक्समधील श्रॉबरी येथील राहणारा जान

  लाडवुइकसाहेब यांचा दुसरा मुलगा जन-

  रल पीटर लाडवुइकसाहेब यांचें स्मारक.”

 हा प्रथम सन १७९९ सालीं ईस्ट इंडिया कंपनीचा नोकर होऊन येथें आला. आणि ९० वर्षांची उमर होऊन हा सन १८७३ मध्यें फ्रान्समध्यें बाग्नेरिस येथें वारला. हिंदुस्थानांतील राणीसरकारच्या