पान:महाबळेश्वर.djvu/201

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १६६ )

 आहे कीं, त्यांत सूर्यांचें किरणांचा प्रवेश बिलकूल होत नाही; व भर दोन प्रहरीं सायंकाळचा भास होतों. यामार्गानें सपाटी ह्मणून अगदीं नाहीं. दीड कोसपर्यंत जातांना एकसारखी खोल खोल व कित्येक ठिकाणींं अगदीं घसरती उतरण लागते. ही उतरण उतरून कोयनेच्या खोऱ्यांच्या किनाऱ्यावर गेलें ह्मणजे पुढें जाण्याचा गाडीमार्ग खुंटतो. ह्मणून इकडे पाहण्यास येणारे लोकांना येथेंच गाडया उभ्या कराव्या लागतात. या ठिकाणीं येण्यास याशिवाय आणखी एक “ डय़ांटु बिरशेबारोड” नांवाची पाऊलवाट मुंबई पाईंंटाजवळ महाड रस्त्यापासून फुटते, या वाटांनीं येथें, कोयनेच्या खोऱ्याचे किनाऱ्यावर दाखल झाल्यावर स्वतः पायीं किंवा घोडयावरून पुढें अगदींं पाईंंटावर जाण्यास तयार व्हावें लागतें. ज्याप्रमाणे लीलेनें हत्ती आपली सोंड समोर करितो त्याप्रमाणें या पाईटच्या पर्वताचीं पाव मैलपर्यत लांब बारीक टोंकदार भूशलाका एकदम खोऱ्यामध्यें घुसते. या सोंडेवरून जातांना मार्ग, कांहींसा नागमोडीसारखा, चिंचोळा असून दोन्ही बाजूनीं सुमारें तीन तीन हजार फूट खोलीचीं खोरीं आहेत. यास्तव