दिसते. बाबिंगटन पाइंट व सातारा रस्ता याचे दरम्यान एक खोरे आहे त्याला ब्लूव्हाली असें ह्मणतात. येयून सोळसी खोरें फार रमणीय देिसतें. बाबिंगटन पाईटवरून सातारा रस्त्यास येऊन तेथून इकडे येण्यास गाडीरस्ता चांगला आहे.
सिडने बेकवुइथ साहेबांचें नांव प्रथम लाडवुइक पाइंटाला दिलें असल्यामुळे त्याला सिडने पाइंटही ह्मणतात. परंतु सन १८२७ मध्यें लाडवुइक साहेब अगदीं प्रथम येऊन सेिडने पाइंटचे टेंकडीवर उतरले होते. त्यांचें नांव या पाइंटाला ठेवावें ह्मणून पुढे सरकारचा हुकूम झाल्यावर लाडवुइक पाइंट असे लोक ह्मणूं लागले. महाड रस्त्यानें जाऊ लागलों ह्मणजे उजवे कडच्या बाजूला जे रस्ते फुटलेले आहेत त्यांतील दुसऱ्या रस्त्याला वळावें, पुढे आणखी एक फूटवाट लागते, तेथेंही उजव्या हातच्या रस्त्यानेंच येथें यावे. रस्त्याला जातांना उतार व येतांना चढण आहे या रस्त्यानें गाडया बेधडक जातात. या रस्त्याला दुतर्फा झाडी आहे. कित्येक जागीं वृक्षाची इतकी गर्दी