पान:महाबळेश्वर.djvu/202

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १६७ )

 जाणारा आपल्या जिवाला भीतभीत व चक्कर येण्याच्या धास्तीनें, बाजूला न पाहतां कित्येक ठिकाणींं काठी टेंकीत टेंकीत या सोंडेच्या अग्रभागीं गेला ह्मणजे तेथें फक्त १२ फूट रुंदीच्या टोंकावर येऊन पोहोचतो. या टोंकास आपले लोक डोमेश्वर व साहेबलोक नोज ( नाक ) असें ह्मणतात.

 या ठिकाणाहून जो कांहीं अद्भूत चमत्कार दृष्टीस पडतो, त्याचें वर्णन देतां येत नाहीं. पाहणाराच्या मनासच तें विचारलें पाहिजे. वृक्षवनस्पतींचा हिरवा गार अफाट समुद्र पुढे पसरलेला असतो. त्यांत शपथेला बोटभर देखील जागा हिरव्या रंगाखेरीज दिसत नाही. व हेंं हिरवें मैदान सभोंवतील पर्वताच्या कोंडमाऱ्यांंतून निघून मोठे होत होत अखेरीस क्षितिजास जाऊन भिडतें, या चमत्कारानें क्षुद्र जंतुवत् पाहणारे जे आपण त्यांची दृष्टि अगदीं फांकून जाते. पायाखालींं तीन हजार फुटीची भिंत उभी पाहून नजर ठरत नाहीं. झोंक गेला तर रसातळास जाण्याची भीति असते. डावेबाजूस मुंबई पाइंट व प्रतापगडचा सुळा उघडा बोडका उभा असतो. पुढें कांहीं अंतरांवर