पान:महाबळेश्वर.djvu/199

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १६४ )

  येथें जे पाइंट किंवा शैलबाहू पाहण्यासारखे आहेत, त्यांत बाबिंगटन, लाडवुइक, एलफिन्स्टन व आर्थर पाइंट हे प्रमुख आहेत. बॉम्बे, कारनॅक, सासून वगैरे दुय्यम प्रतीच्या शाखा आहेत. याशिवाय कनाट पीक मौंट मालकम, रे व्हिला (गव्हर्मेंंट हौस) वगैरे ठिकाणें पाहण्यासारखीं आहेत.

बाबिंगटन पाइंट.

 हा पाइंट दक्षिण दिशेला मालकम पेठेपासून दोन मैलांवर आहे. येथें येण्याचा रस्ता फार चांगला आहे. हा रस्ता बाजारांतून फाउंटन हाटेलवरून चालला आहे. सासून पाइंट उजवे बाजूला टाकून पुढे गेलें ह्मणजे अर्धमैलभर चढ उतार बराच आहे. येथून पुढें जेथें रस्ता थोडा पश्चिमेस वळतो, तेथून अगदीं पाइंटाला जाईपर्यंतचा अर्धा मैल जातां जातां तोंडाला साधारण फेस येऊन जातो व धापहीं लागते. हा चढ चढला ह्मणजे मनुष्य पाइंटावर येऊन पोहचतो.

 हा पाइंट सुमारें ४२०० फूट उंच आहे. ह्या ठिकाणाहून कोयना खोरें व सॅॅडलबॅगहिल हीं फार छानदार दिसतात. शिवाय; दुसरी वनशोभाही बरीच