पान:महाबळेश्वर.djvu/198

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १६३ )


मोठी थोरली दरी असते. या बाहूंच्या टोकांस येऊन उभे राहिले ह्मणजे समोरचा डोंगराळ प्रदेश साफ दिसतो आणि प्रतिबंधाच्या अभावामुळे जोरानेंं वाहणारा वारा मिळतो. साहेब लोकांनींं या पाइंटांवर हवा खात बसण्यासाठींं फार चांगल्या सोई केल्या आहेत, त्या अशा कींं त्या ठिकाणी आसपासची झाडी तोडून व जमीन साफ करून गाडया फिरविण्याजोगेंं मैदान केलेले असते, आणि पाइंटाच्या शेंंवटास येऊन उभे रहाणाऱ्या जिज्ञासु प्रेक्षकांचा सृष्टिसौंदर्य अवलोकन करण्याच्या नादांत, तोल जाऊन कडेलोट होऊंं नये, ह्मणून पाइंटांच्या सभोवती बहुधा दगडी भिंत घातलेली असते. अशा या रम्य स्थळींं अनेक युवयुवती सकाळ संध्याकाळ आपली करमणूक करण्यासाठींं येत असतात. तथापि या ठिकाणी कोणांस जी कांंही करमणूक करून घ्यावयाची असेल ती त्यानेंं सकाळी सहा वाजण्याच्या पुढेंं व संध्याकाळींं सहा वाजण्याच्या अगोदर करून घेतली पाहिजे, तसेंं न केल्यास एखादे वेळी प्राणांतिक अवस्था होणेचा संभव आहे.