पान:महाबळेश्वर.djvu/197

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १६२ )

 एकमेकांस लागून गेलीं असल्यामुळे, अगोदर तीं मोठयानें हालत नाहीत व थोडी बहुत हालली, तरी त्यांपासून मोठा वारा सुटत नाहीं. तसेंच बाह्य प्रदेशांतून आलेला वाराही या झाडांत गुरफटून जातो आणि क्षणोंंक्षणीं लहान लहान टेकड्यांचा व वृक्षरायीचा त्यास प्रतिबंध होत असल्यामुळे त्यांची गति खुंटते; आणि सर्वत्र सामसूम होतें! ज्याला वाहता वारा पाहिजे असेल, त्यानें आपला बंगला किंवा घर सोडून एखाद्या उंच व मोकळ्या ठिकाणी गेलें पाहिजे. अशी येथें दाट झाडी लागून गेली असल्यामुळे अशा मोकळ्या जागा येथें मुद्दाम केलेल्या आहेत त्यांस पांइट म्हणतात. या पांइटांला येण्यास गाड्याचे घोडयांचे व पायीं जाण्याजोगे रस्ते केलेले आहेत.

 ज्याप्रमाणें एखाद्या मोठया किल्ल्याच्या तटांस सोडून पुढें आलेले बुरूज असतात त्या प्रमाणें पर्वताच्या मुख्य रांगेपासून उजव्या व डाव्या बाजूस कांहीं कांहीं अंतरावर फुटलेल्या ज्या शाखा किंवा बाहू दिसतात त्यांस पॉइंट असें ह्मणतात. अशा प्रकारच्या दोन पर्वत शाखांत किंवा बाहूंत